जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
दारुबंदी कायद्यांतर्गत सोळा गुन्हे असलेला हुसेन सरदार तडवी (वय ४३, रा. चिलगाव, ता. जामनेर), सहा गुन्हे दाखल असलेला राकेश मधुकर कोळी (वय २७, रा. भोलाणे, ता. जळगाव) यांच्यासह सुरज अशोकराव भोगे उर्फ भांगे (वय २४, रा. पापा नगर, भुसावळ) या तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी सायंकाळी काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार हुसेन तडवी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. तर जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील – भोलाणे येथील राकेश कोळी याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्या वागणुकीत सुधारणा होत नव्हती. – तसेच त्यांना कायद्याचा देखील धाक राहीलेला नव्हता त्यामळे या दोघ सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई व्हावी. यासाठी त्यांच्यावर हातभट्टीवाला यांतर्गत एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तयार करुन तो सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूरी दिली असून राकेश कोळी याला छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहात तर हुसेन तडवी याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज भोगे उर्फ भांगे याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध धोकेदायक व्यक्ती म्हणून त्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर त्याची मुंबई मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.