जळगाव मिरर | २३ मे २०२३
महाराष्ट्र पोलिस दलात रिक्त असलेल्या जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा बृहन्मुंबई पोलिस दलाचा निकाल नुकताच जाहीर झाला. दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी अंतिम निकालात यश संपादन केले.
सोपान कांडेलकर, विशाल लवंगे, शेखर बोदडे यांची पोलिस शिपाईपदी, प्रदीप पाटील व पूजा कोळी यांची पोलिस चालकपदी निवड झाली. मुंबई अग्निशमन विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचाही निकाल जाहीर झाला असून, सुप्रिया पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. एमपीएससीमध्ये दर्जी फाउंडेशनचा निकाल महाराष्ट्रात सर्वोत्तम असला, तरी पोलिस भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश तेवढेच महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. गोपाल दर्जी, ज्योती दर्जी व दर्जी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.