
जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
आई बहिणीला घेवून दवाखान्यात गेली होती, तर वडील कामाला गेलेले होते. त्यामुळे घरी कोणीच नसतांना सपना विजय तायडे (वय १६, रा. सुप्रिम कॉलनी) या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीत सपना तायडे ही मुलगी आई, वडील व लहान भावासोबत वास्तव्यास होती. तीचे वडील एमआयडीसतील एका कंपनीत काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. काही दिवसांपुर्वी सपनाच्या मोठी बहिणीची प्रसुती झाल्यामुळे तीची आई शुक्रवारी तीला घेवून दवाखान्यात गेली. होती. तर वडील कंपनी कामावर गेले होते. त्यामुळे सपना ही घरी एकटीच होती. त्यावेळी घरी कोणीही नसतांना सपना हीने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच, नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर सपना हीला खाली उतरवून तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. सपना हीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नुकतीच दिली होती दहावीची परिक्षा सपना हीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. तीने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांनी मुलीचा मृतदेह बघताच एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.