• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पैशांच्या हव्यासाने गेला सूनेचा बळी : २२ वर्षीय गर्भवती विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 4, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पैशांच्या हव्यासाने गेला सूनेचा बळी : २२ वर्षीय गर्भवती विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जून २०२५

राज्यातील पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रमाणेच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देखील एक धक्कादायक आत्महत्या समोर आली आहे. चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासामुळे आशाराणी पवन भोसले (वय 22) या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे ३ जून रोजी दुपारी १२:४५ वा. च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आशाराणी पवन भोसले, असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आशाराणीचे वडील नागराज बरुण्णा डोणे (रा. रायचूर, ता. जि. रायचूर, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती पवन भोसले, सासू अलका बलभीम भोसले, सासरे बलभीम चंद्रभान भोसले, यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोली काटी एमआयडीसी परिसरातील पवन भोसले याच्यासोबत आशाराणीचे लग्न ५ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले होते. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पवन भोसले याचा मानपान करून लग्न केले. आशाराणीची मोठी बहीण त्याच घरात नांदत होती. दोघीही मुली सख्या दोन भावांना दिल्यामुळे त्यांचा संसार चांगला सुरु होता. आशाराणी हिला तीन वर्षांची मुलगी आहे.

लग्नानंतर २ वर्षे पवन याने आशाराणी हीस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर तो तिला चारचाकी वाहन घेण्यासाठी व खर्चासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेवून ये, असे म्हणून वारंवार मारहाण शिवीगाळी करत होता. त्याबाबत आशाराणी ही माहेरी गेल्यानंतर सांगत होती. तिच्या आई-वडिलांनी सासरच्यांना आमची परिस्थीती नाही, तुम्ही पवनला समजावून सांगा असे सांगितले. मात्र त्यांनीही आम्हाला ‘आमच्या मुलाचा मानपान केला नाही, लग्नात हुंडा दिला नाही, त्यामुळे तो पैसे मागत आहे, तुम्ही पैसे द्या,’ असे म्हणाले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनीसुद्धा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तिचा छळ सुरूच होता.

दोन्ही मुली एकाच घरात दिल्या असल्यामुळे फिर्यादी मुलीचे वडील नागराज बरुण्णा डोणे यांनी एकीमुळे दुसरीचा पण संसार मोडेल म्हणून पैशाची तजवीज करुन जावई पवन भोसले याला ऑनलाईन पैसे पाठविले. त्यानंतरही तिला त्रास सुरूच होता. तुमच्या मुलीला स्वयपाक येत नाही, ती आमच्या मुलाची किंमत करत नाही, अशा तक्रारी आईवडिलांना सांगितल्या जात होत्या. होणारा त्रास आशाराणी आपल्या वडिलांना फोन करून सांगत होती. आता सहन होत नाही, म्हणत होती. मात्र हतबल आई-वडील दोन्ही मुलींना व्यवस्थीत संसार करा, असेच सांगत होते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये आशाराणीला पती पवन भोसले याने मारहाण करुन घरातून हाकलून दिले. त्यानंतर मुलीसह माहेरी रायपूर येथे आली होती. माहेरच्यांनी याबाबत विचारले असता तिच्या पतीने मारहाण केली, पैसे घेऊन ये नाहीतर घरी येऊ नको, असे सासू-सासरे यांनी सांगितले. दरम्यान, पतीने सोलापूर येथील महिला तक्रार निवारण कक्षात पत्नी नांदायला येत नाही, अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी समुपदेशन करून आशाराणीला नांदायला पाठवले. मात्र त्यानंतरही तिला पती, सासू-सासरे वारंवार त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी दुपारी घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेवून जीवन संपवले.

Related Posts

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण
क्राईम

दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण

March 10, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

५० लाखांच्या विम्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड : जिल्ह्यातील डॉक्टर व ४ पोलिसांसह ७ जण अटकेत

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group