
चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पंतप्रधान फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा, पावसाचा खंड पडला असल्याकारणाने विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा असे निवेदन कृषी अधिकारी चाळीसगाव यांना प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भोसले यांच्या आदेशाने चाळीसगाव महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष स्वाती कुमावत यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी दीपक पाटील, किशोर पाटील ,सोनू सोनार, दिलदार शेख आदींनी चाळीसगाव तालुका कोरडा दुष्काळ घोषित करावे असे निवेदन दिले.





















