जळगाव मिरर / १० मार्च २०२३
देशभर मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा झाला यावेळी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. बुरा न मानो, होली है…! हे शब्द वापर करीत अनेक मित्र मैत्रीण व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. अशातच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एक प्रेमी युगुलावर प्रेमाचा रंग चढलेला दिसला. होळीच्या दिवशी हे प्रेमवीर दिवसा बाइकवर एकमेकांच्या मिठीत रमले होते. त्यांचा हा बाइकवरील रोमान्स अख्ख शहर पाहत होतं. या वर्षाची सुरुवातच कधी बाइक, तर कधी स्कुटी तर कधी कारचा रूफ टॉपवर कपल रोमान्स करताना दिसून आले.
व्हिडीओमध्ये एक तरुण बुलेट चालवताना दिसत आहे. तर तरुणी पेट्रोल टाकीवर बसून त्या तरुणाला मिठी मारून बसली आहे. अधूनमधून ती तरुणी तरुणाला किस करताना दिसतं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनीही हेल्मेट घातलेला नव्हता. होळीचा रंग या दोघांवर चढला होता असं दिसतं होतं. होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं मर्यादा ओलांडल्या आहेत. अश्लिलतेचं असं प्रदर्शन पाहून नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. बाइकवर कपलचे हे चाळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
Jaipur.. होली पर सरेराह आशिकी । सोशल मीडिया पर युवक युवती का वीडियो हुआ वायरल। b2 बाईपास का बताया जा रहा है वीडियो . मोटरसाइकिल पर आशिकी करते दिखे युवक-युवती। मोटरसाइकिल के नंबर के आधार पर अब पुलिस कर रही है तलाश। संभवतः ट्रैफिक पुलिस कर सकती है चालान… pic.twitter.com/lZgpY0LsVu
— Jitesh Jethanandani (@jethanandani14) March 7, 2023
कुठलीही आहे घटना?
हा व्हिडीओ ट्वीटरवर Jitesh Jethanandani या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील जयपूरमधील आहे. जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.