
जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३
गेल्या दोन वर्षापासून नेहमीच राज्यभर सोशल मिडीयावर व वादात अडकलेले नाव म्हणजे गौतमी पाटील. हीच आज देखील चर्चा तशीच आहे. ती नेहमीच दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च.
कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल असतं. मात्र, अश्यातच गौतमीच्या नवीन गाण्याचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. नुकतंच तिचं ‘घोटाळा झाला..’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या नृत्यशैलीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच गाण्यातील गौतमीच्या अदा प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.