
जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरु झाला असून भाजप शिवसेना शिंदे गटानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून मात्र काही जागांवरुन असलेल्या मतभेदांमुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. महाविकास आघाडीतील मतभेद मिटतील का? यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 4-5 जागांवर मतभेद होते. मात्र ते मतभेद आता मिटले असून उद्या काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस किती जागांवर लढणार हे तुम्हाला उद्या कळेल. उद्धव ठाकरे आणि आमच्यामधील मतभेद जवळपास संपत आलेले आहेत. 4 ते 5 जागांवर वाद होता, पण तोही आता मिटला आहे, असे पटोलेंनी सांगितले. कार्यकर्ते खोक सरकारला मतदान करणार नाहीत, काँग्रेसला पाठिंबा देणार यावर पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसला देणाऱ्या पाठिंब्याबाबत आम्ही बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम करण्यास झालेल्या विलंबाने छोट्या घटक पक्षांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या भागीदारांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना, विरोधीपक्षांचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, डावे पक्ष आणि शेतकरी आणि कामगार पक्ष यांच्यासह इतर छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातच असे झाले तर हरियाणा प्रमाणे काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची स्थिती ही हरियाणाप्रमाणे होईल, असा कडक इशाराच या घटक पक्षांनी दिला आहे.