
जळगाव मिरर | २० जून २०२४
शहरातील मेहरूण परिसरातील संस्कृती माध्यमिक विद्यालय येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एकूण ४०० वह्या वाटप करण्यात आल्या.
सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योती राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.वाय.फालक यांनी केले. या उपक्रमासाठी अध्यक्ष सौ मनिषा पाटील,श्रीमती ज्योती राणे, ॲड.सीमा जाधव, नूतन तासखेडकर,डॉ अमृता सोनवणे , नेहा जगताप, वंदना मंडावरे, संगीता रोटे, मरियम बुगडवाला, अर्चना पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सौ डी.सी. येवले व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते




















