जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात चारित्र्यांच्या संशयावरुन अनेक धक्कादायक घटना समोर येत असतांना आता भंडारा जिल्ह्यातून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने चारित्र्यांच्या संशयावरुन बहिणीची हत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे. हि घटना मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांना आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय आशिष गोपीचंद बावनकुळे हा भाऊ अश्विनी बावनकुळे (वय 20 वर्ष) हि त्याची बहीण असून तिच्या चारित्र्यावरुन संशय घेत होता. याच मुद्दयावर दोघांमध्ये भांडण झालं. भांडणांचा रुपांतर वादात झालं. अश्विनीदेखील आशिषला प्रत्युत्तर देत होती. यानंतर संतापलेल्या आशिषने अश्विनीने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला. घटनेची पोलिसांनी दखल घेत गुन्ह्याची नोंद करुन घेतली आहे. आरोपी आशिष बावनकुळेला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.