जळगाव मिरर / ३१ जानेवारी २०२३
जळगाव शहर महानगर पालिकेच्या आयुक्त पदावरून गेल्या दोन महिन्यापासून मोठा वाद सुरु होता. त्यावर आज अखेर पडदा पडला असून महानगरपालिका आयुक्तपदाचा मॅट’ने निकाल देत डॉ. विद्या गायकवाड यांना आयुक्तपदी कायम ठेवले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला तिढा सुटला आहे.
जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ मनपा मध्ये येत पदभार स्वीकारला होता. त्यानंतर देविदास पवार यांनी एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप करत डॉ. विद्या गायकवाड यांनी करत मॅट’ने मध्ये तक्रार केली होती. मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. तब्बल दोन महिने तारीख वर तारीख होत आज मॅट’ने निकाल देत डॉ. विद्या गायकवाड यांना आयुक्तपदी कायम राहण्याचे आदेश दिले आहे.