
जळगाव मिरर | १२ मे २०२६
शहरातील आर. एल. हॉस्पिटल समोर दि. १० मे रोजी पुढे चैन चोरीला गेली असून पोलीस असल्याची बतावणी करीत दोघ इसमांनी – दुचाकीवरुन जाणाऱ्या माधव पितांबर पाटील (वय ७१, रा. कुर्ला कॅम्प उल्हासनगर) या वृद्धाला थांबवले. त्यांना अंगावरील सोन्याची दागिने काढून खिशात ठेवायला सांगत हातचालाखी – करीत सात तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हास नगर येथील माधव पिंताबर पाटील हे वृद्ध दि. ९ मे रोजी विश्राम नगरात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. दि. १० रोजी दुपारच्या सुमारास ते (एमएच १२, एनएन ९८२२) क्रमांकाच्या दुचाकीने महामार्गाने अजिंठा चौफुलीकडे जात होते. त्यावेळी आर. एल. हॉस्पिटलसमोर दोन इसम हे साध्या गणवेशात उभे होते. त्यातील एकाने माधव पाटील यांना थांबवून आम्ही पोलीस आहोत पुढे एका इसमाची चैन चोरीस गेली आहे. तुम्ही तुमच्या अंगावरील सोने काढून खिशात ठेवा असे सांगितले. यावेळी वृद्ध पाटील यांनी दोघ इसमांना ओळखपत्र मागितल्यानंतर त्यांनी पोलीस असल्याचे ओखळ पत्र दुरुन दाखवून खिाशत ठेवून घेतले.
वृद्ध माधव पाटील यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी घडलेली घटना त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ते लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी माधव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.
अनोळखी इसमांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वृद्धाने त्यांच्या अंगावर परिधान केलेले साडेतीन तोळ्याचे ब्रेसलेट, दोन तोळ्याची चैन, ५ ग्रॅमच्या दोन व सात ग्रॅमची एक अंगठी असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज काढून तो पॅन्टच्या खिशात ठेवत होते. त्याावेळी त्या इसमांनी मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या अंगावरील दागिने काढून दिले. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या दोघांनी वृद्धाने काढलेले दागिने कागदात व्यवस्थित ठेवून देतो असे सांगून त्यांच्याजवळील दागिने स्वतः कडे घेतले. त्यानंतर कागदाची पुडी बनवून ती वृद्धाकडे देवून टाकली. आकाशवाणी चौकात गेल्यानंतर वृद्ध माधव पाटील यांनी पुडी उघडून बघितल्यानंतर त्यांना एका कॅरीबॅगमध्ये ६ तांबेरी व काळ्या रंगाची अंगठ्या दिसल्या.




















