जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२४
जळगावचे माजी खा.उन्मेष पाटील यांचे दि.२३ रोजी दुपारी ११ वाजेपासून गिरणा नदीपात्रात शेतकऱ्यांसोबत जलसमाधी आंदोलन करीत असून यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री महाजन म्हणाले कि, गिरणा नार-पार योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तरीही हा प्रकल्प होणार नाही, यादृष्टीने गैरसमज पसरविला जात आहे. त्याचाच भाग म्हणून गिरणा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकार केवळ ‘नौटंकी’चा भाग असल्याचे म्हणत त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधानांनी अनेकविध योजना आणल्या आहेत. त्यातून माता-भगिनींना न्यायासह आधाराची वाट मिळताना दिसत आहे. त्यामुळेच लखपती दीदींच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ते महाराष्ट्र भूमीत येत आहेत. ही बाब जळगावकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले,