जळगाव मिरर | २० नोव्हेबर २०२३
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल मधील २०१० व २०११ वर्षाची शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा दि.१८ रोजी स्नेहसंमेलन झाले यावेळी अनेकांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.
आम्ही जिथ द्यानाचे धडे घेतले अशी आमची शाळा श्री बी.बी.ठाकरे हायस्कूल वावडे येथे दि.१८ नोव्हेबर रोजीवर्ष २०१०/११ साली दहावी उत्तीर्ण झालेले आम्ही सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्र जमून जुन्या आठवणीनीना उजाला दिला.खूप अविस्मरणीय क्षण आमच्या आयुष्यात या एकत्रिकरणामुळे मुळे आला तसेच सर्व वंदनीय शिक्षक वर्ग आवर्जून आम्हाला भेटण्यासाठी सुद्धा उपस्तीत होते.आयोजन संकेत लांडगे, चेतन लोहार यांनी केले तर सूत्र संचालन पूजा पाटील व पुनम पाटील यांनी केले. यावेळी गणेश पाटील, मयूर गोसावी,संदीप साळुंखे,जितेंद्र पाटील,धनश्री पाटील,नयना पाटील,कैलास पाटील,भावना देसले,महेश पाटील,आतिश पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.