जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
तालुक्यातील भोकर गावातील रहिवासी शेतकऱ्याने चक्क कपाशीच्या शेतात गांजाची झाडं लावणाऱ्या प्रकाश सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करीत गांजाची २७ झाडं जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी तालुका पोलिसांनी भोकर-पळसोद शिवारात केली. या प्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिस शेतात पोहचले. शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे २७ झाडं लावलेली आढळून आली. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलवून खात्री करीत पंचनामा केला. ही झाडं जप्त करण्यात आली असून १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये त्याची किंमत आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोउनि गणेश सायकर, नयन पाटील, पोहेकॉ दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील यांनी केली.