जळगाव मिरर | १५ जुलै २०२४
भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचारी हे भुसावळ विभागात भुसावळ-पुणे या रेल्वेप्रवासादरम्यान तिकीट तपासणीचे काम करत होते. त्याचवेळी अहमदनगर येथे त्यांना तिकीट तपासणी करणारा बनावट टीसी आढळून आला. त्याच क्षणी भुसावळ विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांनी बनावट टिसीला पकडून दौंड कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागाचे तिकीट तपासणी – कर्मचारी अवधीश कुमार आणि जी. टी. – साबरे हे १२ जुलै २०२४ रोजी ट्रेन क्र १२१५० भुसावळ पुणे दरम्यान सेवेत होते. कार्यरत असताना यावेळी वाणिज्य नियंत्रण ९ पुणे यांच्याकडून त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती प्रवाशांचे तिकीट तपासून पैसे गोळा करत आहे. त्यानुसार अहमदनगर येथे ट्रेन आल्यानंतर, दोन्ही कर्मचाऱ्यांनी गाडी क्रमांक १२१५० च्या सामान्य डब्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना एक व्यक्ती प्रवाशांचे एन ई तिकीट तपासताना व पैसे गोळा करताना आढळू आला. संशयिताला तिकीट तपासणी कर्मचाऱ्याची ओळख स्थापित करण्यास सांगितले असता, संशयिताने आढेवेढे घेत असफलता दर्शवली. संशयितास तत्काळ अहमदनगरमध्ये एक बनावट संशयितास तत्काळ अहमदनगरमध्ये एक बनावट तिकीट तपासणीच्या नावे प्रवाशांची फसवणुक करताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर, आरोपीस पॅन्ट्री कारमध्ये नेण्यात आले व वाणिज्य नियंत्रण पुणे यांना संशयितास पकडल्याची माहिती देण्यात आली. बनावट तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी दौंड कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.