
जळगाव मिरर | ५ जून २०२६

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील घरकूल परिसरात राहणाऱ्या राहुल संजय गायकवाड (वय २२) या युवकाने ४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नातेवाईक व मित्रांना मोबाईलवरून मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने चंद्रकांत जावळे यांच्या शेताजवळील लिंबाच्या झाडास कापड बांधून गळफास घेतला.

लागलीच संबंधित मित्र व नातेवाईक घटनास्थळी गेले असता राहुल गायकवाड मयत अवस्थेत आढळून आला. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात चंद्रकांत सोनवणे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो.नि. मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अभय ढाकणे, हे.कॉ. अविनाश पाटील, सतीश सानप, कॉ. किरण जाधव, भूषण सपकाळे करत आहे. मयत राहुल गायकवाड मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे आई, वडील, भाऊ हे गरीब असून ते ही मजुरी करून उदरनिर्वाह करतात. राहुल गायकवाड यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.




















