जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात सदू ओंकार चव्हाण (वय ६५, रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा. ह.मु. सेंट टेरेसाशाळेजवळ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक प्रकाश सागर राठोड (रा. रामदेववाडी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील समाधान चवहण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे वडील सदू ओंकार चव्हाण हे रस्ता ओलांडत होते. यावेळी जळगावकडून पाचोराकडे जात असलेल्या (एमएच २०, बीएल १९९७) क्रमांकाच्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात सदू चव्हाण या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. २८ रोजी रात्रीच्या सुमारास पाचोरा रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉनसमोर घडली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा समाधान चव्हाण याने दिलेल्या तक्रारीवरुन बस चालक प्रकाश सागर राठोड रा. रामदेववाडी ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.