जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
देशात हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार असून त्यासाठी जळगावात देखील भाजपच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून पाच दिवसीय दि.११ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची माहिती हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.
डॉ.सोनवणे म्हणाले कि, दि.११ ऑगस्टपासून जळगाव शहरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात येणार असून दि.११ रोजी शहरातील विविध परिसरातील राष्ट्रपुरुषांचे स्मारक पाण्याने धुवून स्वच्छता करण्यात येणार तर दि.१२ रोजी राष्ट्रपुरुषांचे स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तर दि.१३ रोजी शहरातील प्रत्येक मंडळात तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार आहे. दि.१४ रोजी विभाजन विभिषिका स्मृती दिवस होणार आहे. दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजवंदन करून शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
दुचाकी रॅलीचा मार्ग – शहरातील जी.एम.फौंडेशन येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. पुढे हि रॅली नेहरू चौकमार्गे रेल्वे स्टेशन, लालबहादूर शास्त्री टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक, झाशीची राणी स्मारक, नेरी नाका, पांडे चौक, सिंधी कॉलनी, डी मार्ट, काव्यरत्नावली चौक, एम. जे. कॉलेज, महाराणा प्रताप स्मारक, रिंग रोडमागे कोर्ट चौक येथील शिवतीर्थ याठिकाणी समारोप होणार आहे.
हर घर तिरंगाचे मुख्य संयोजक माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांनी संगितले आहे. यावेळी डॉ.राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, अमित भाटिया, धीरज सोनवणे, मयुर कापसे, अमित काळे, महेश पाटील, मनोज काळे, शक्ती महाजन, सुनील सरोदे, गोपाल पोपटानी, राहुल घोरपडे, बापु कुमावत, संजय शिंदे, महादु सोनवणे, महेश कापुरे हे सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.