जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
देशभर सध्या पवित्र श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त जळगाव शहरातील देखील भाविक भक्तांना भव्य श्री शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा यासाठी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून रुद्राभिषेक व रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ गोशाळा येथे दि.२० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ पर्यत दुपारी २ वाजेपासून कथा प्रवक्ते ह.भ.प.देवदत्त महाराज यांच्या मुखातून श्री शिव महापुराण कथेचे वाचन होणार आहे. तसेच दि.२२ ते २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता. रुद्राभिषेक होणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी केले आहे.