चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथून जवळ असलेल्या एका गावातील शेतात एका 83 वर्षीय वृद्ध घरी एकटा असताना घरात घुसत अनोळखी इसमाने पाणी मागण्याच्या बहाण्याने जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी मिळून बारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेले चिंचगव्हाण या शिवारात शेत गट नंबर ३२० मध्ये बांधलेल्या घरात चुडामन महादू निकम(वय ८३) हे दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरांमध्ये एकटे असताना एक अनोळखी ३० ते ३२ वयाचा तरुण घरात घुसून त्यांना पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांनी त्या इसमास पाणी दिले असता त्यांच्या हातातील ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल झटापट करून वृद्ध व्यक्तीला ढकलून देत मोबाईल जबरीने काढून घेत पोबारा केला आहे. या प्रकरणी चुडामन निकम यांनी मेहूनबारे पोलीस स्थानक गाठत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड हे करीत आहे.