जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
नुकतेच जून महिन्यापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. तर शहरातील अनेक परिसरातील गरजू विध्यार्थी व विद्यार्थिनीपर्यत शैक्षणिक साहित्य पोहचले नसल्याने शहराचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी एका सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शाळेत साहित्य वाटप करण्याचा मानस डॉ.अश्विन सोनवणे यांनी घेतला आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या मदतीने शहरातील प्रत्येक शाळेतील विध्यार्थी व विद्यार्थ्यानीना वही वितरण करण्याचे कार्यक्रम दि.१५ जुलै २०२४ रोजी पासून सुरु होत आहे. माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे हे प्रत्येक शाळेत स्वतःहा जावून प्रत्येक विद्यार्थी पर्यंत वही पोहचविणार आहे. जेणेकरून गोरगरीब विध्यार्थी देखील शालेय शिक्षण घेवून प्रगती करू शकतो हाच ध्यास त्यांनी मनाशी बाळगला आहे.