जळगाव मिरर | २० जुलै २०२४
विरुद्धदिशेने जाणारी दुचाकी व भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक एवढी जोरात होती की, अपघातानंतर कारच्या एअरबॅग उघडल्या होत्या. हिरालाल मेहता (३०) व नारायण बामणे (४५), दोन्ही रा. नशिराबाद अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे कार (क्र. एमएच १९, ईए ८५०२) येत असताना जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर नशिराबादनजीक विरुद्ध दिशेने एक दुचाकी जात होती. त्यावेळी दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले आहे. अपघातानंतर नशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहोचले व अपघातीग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात नेण्यात आली. कारमध्ये जळगावातील पती, पत्नी व मुलगा असे तिघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी नारायण बामणे यांना गंभीर दुखापत झाली आहे.