• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “जागतिक आरोग्य दिन” उत्साहात

पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान ; विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “जागतिक आरोग्य दिन” उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४

दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता हा असून या औचित्याने ता. ६, शनिवार रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” तसेच “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयांवर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आरोग्याचा सर्वोच्च बिंदू आहे आनंद, त्याचे रहस्य भारतीय परंपरांत दडलेले आहे, आपण ते पुन्हा अंगीकारावे तसेच आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे असून जगभरातील लोकांना आरोग्याप्रति जागरूक करण्यासाठी आणि निरोगी आरोग्य हीच आयुष्याची शिदोरी आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने आज रायसोनी इस्टीट्यूटच्या वतीने पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले असून या व्याख्यानाचा उपस्थितांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी यावेळी म्हटले.

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह यांनी “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयावर मार्गदशन करताना नमूद केले कि, शरीर तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण असेल तरच सर्व संकल्प तडीस जाऊ शकतात. त्यामुळेच आपणही “स्ट्रेस फ्री लाईफ” जगू शकतो, मुळात जीवनशैलीत बदल झाल्याने आहारातही बदल झालेले दिसून येतात. अनेक जण रेडी टू इट पदार्थ किंवा इन्स्टंट फूड खाणे पसंत करतात. जंक व नॉनव्हेज फूड प्रेमी असाल तर आतापासूनच या आहाराचे सेवन बंद करण्याचा संकल्प करा, ते शक्य नसल्यास किमान असे फूड खाण्याचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प करावा कारण अशा आहारामुळे आरोग्य चांगले राहण्याऐवजी, पोषण मिळण्याएवजी आरोग्यासाठी धोका वाढतोय. बाहेरील तयार पदार्थ किंवा झटपट खाता येणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. परंतु पोषक घटकांचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. त्यामुळे शरीराचे पोषण होण्याऐवजी स्थूलता वाढीस लागते आणि आरोग्य समस्या निर्माण होतात. तसेच प्रत्येक व्यक्तीचा बहुतांश वेळ सध्या लॅपटॉप आणि त्याहि पेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये जातो आहे. गॅझेटच्या अतीवापराचे दुष्परिणाम यावर अनेक संशोधनही झालेले आहेत. त्यातून हेच स्पष्ट झाले की ज्या व्यक्ती गॅझेटचा अतिवापर करतात त्यांचा आजूबांजूच्या व्यक्तीशी असलेला संपर्क तुटतो. मेंदूतल्या तणावाची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यक्ती आक्रमक होते. ज्या व्यक्ती गॅझेटवर अधिकाअधिक अवलंबून असतात त्यांच्यामध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होते.

अशा लोकांच्या सामाजिक, भावनिक समस्यांमध्येहि वाढ होते. कारण ते घरातच बसून आभासी जगात वावरत असतात. यापासून बचाव करण्यासाठी घराच्या बाहेर पडा, कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवा. तसेच व्यायाम आणि योग या दोन्ही शरीर आणि मन स्वस्थ आणि संतुलित राखतात. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमता तंदुरस्त राहते. व्यायाम हा रोगप्रतिकारक क्षमता चांगले राखण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्थात वर्कआउट किंवा व्यायाम म्हटले की जीममध्ये जाऊन काम गाळणे असेच बहुतेकांना वाटते. पण, केवळ जिममध्ये जाणे म्हणजे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल असे नाही. तर जो व्यायाम दिवसातून 30 मिनिटे सलग करू शकता, ज्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वसनाची गती वाढते तसेच रक्तदाब वाढतो असा कोणताही व्यायाम करावा पण तो नियमितपणे करावा तसेच पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते असे नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांनी “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हटले कि, वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार आणि गरज दोन्हीही सातत्याने वाढत आहे.

आरोग्यसेवेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वैदयकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन गरजेचे असून आरोग्य सेवेतील समस्या ओळखून त्यावर योग्य उपाय शोधून काढण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्याचा वापर करता येईल, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा बरा होण्याचा कालावधी कमी कसा करता येईल यासाठी संशोधन करण्याची देखील गरज असल्याचे त्यांनी म्हटले तसेच आरोग्य क्षेत्रातील बौद्धिक संपदा यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी कार्यक्रमाचे समन्वय साधले व आभार व्यक्त केले तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group