• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “कश्ती” या विद्यापीठस्तरीय “मॅनेजमेंट फेस्ट”चे आयोजन

विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ; नाविन्यता व उद्योजकतेवर विविध स्पर्धा संपन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “कश्ती” या विद्यापीठस्तरीय “मॅनेजमेंट फेस्ट”चे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मार्च २०२४

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा विद्यापीठस्तरीय “कश्ती” हा दोन दिवसीय मॅनेजमेंट युवा फेस्टिवल सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावर्षी “नाविन्यता व उद्योजकता” या विषयावरील विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर प्रा. शरदचंद्र छापेकर, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. जितेंद्र जमादार, प्रा.डॉ. विशाल राणा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविकेत नमूद केले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सुप्त कला गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व नियमित शिक्षणासोबतच 360 डेव्हलपमेंट सहित कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून “कश्ती” या युवा महोत्सवात विविध उद्योग संबंधित शार्क टॅक व बिजनेस प्लान सारख्या स्पर्धा आयोजित केल्या आहे तसेच वर्षभर थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात.

यावेळी त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून देत विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच मॅनेजमेंट व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती देत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु झाल्याचे सांगत या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख अतिथी प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी तरुणांना मिळणारे मॅनेजमेंट फेस्टिवल हे विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असे विचार मंच असून या विचार मंचातून अनेक संशोधक, उद्योजक तयार होत असतात, ही संधी तुम्हाला सुद्धा आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी मेहनत घ्या. विद्यार्थ्याने स्व:शिस्त अंगीकारावी कारण तुमच्या यशस्वीतेमागे शिस्तबद्धता सर्वात महत्वाची आहे भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत जो शिक्षणक्रम मनापासून आवडतो त्यातच आपले करिअर करा व केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुद्धा तितकाच मानसन्मान देणारा व अर्थप्राप्ती देणारा असतो याची सुद्धा जाणीव ठेवा असे भावनिक आवाहन करत महाविद्यालयाचे विद्यार्थी देश – विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ता. २८ व २९ या दोन दिवसीय मॅनेजमेंट फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये शार्क टॅक, अॅड-मॅड शो, टॅग लाईन अ‍ॅन्ड लोगो डिझाईन, पोस्टर सादरीकरण, बोर्ड रूम बॅटल, बॉली जिज्ञासा अशा विविध स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण करत प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातून २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयामध्ये सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय युवा महोत्सव कश्ती २०२४ या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बोर्ड रूम बॅटल व बॉली जिज्ञासा या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. शार्क टॅक स्पर्धेत परीक्षक म्हणून अजिंक्य तोतला तसेच अॅड-मॅड शो, टॅग लाईन अ‍ॅन्ड लोगो डिझाईन या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गौरव कोगटा व प्रा. तन्मय भाले तर पोस्टर सादरीकरण व बॉली जिज्ञासा स्पर्धेचे कादंबरी चौधरी, प्रियंका शर्मा व प्रा. अंजली बियाणी यांनी परीक्षण केले. तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी “कश्ती” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वय प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव व प्रा. निखील ठाकूर यांनी मुख्यत्वे सांभाळले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले. तर प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. श्रेया कोगटा, प्रा. रोहित साळुंखे, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. सरोज पाटील, प्रा. कविता पाटील यासह स्टुडंट कोंसीलच्या विध्यार्थ्यानी व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

यांनी मिळवली विविध स्पर्धेत पारितोषिके
रायसोनी शार्क टँक स्पर्धेत प्रथम – भूषण ए. परदेशी, चेतन राजेंद्र पाटील सौरभ गजानन आघाव (डिजिटला मार्केटिंग टीम) द्वितीय – योगिता अजय गायकवाड, कृष्णा.सी.पाटील, साक्षी .बी. पाटील, लोकेश तलरेजा (साइन टू व्हॉईस ग्लोव्हज) तृतीय- चैताली विजय सोनार, दिव्या पांडुरंग शिंदे, प्राची किशोर ठाकरे, प्रिती संदिप सुरडकर (सीएसपी ब्रिक डेव्हलपमेंट)
अॅड-मॅड शो स्पर्धेत सांघिक प्रथम – कुणाल शर्मा, श्रीकेश पाटील, रोनित बाविस्कर, चेतन राठोड,
जागृती जगवाणी, गौरवी सोनार द्वितीय – विराज सोनार, सुनिधी झा, यश तायडे, मोनिका वर्मा, तृतीय- रेणुका मुंगळे, मनीष मांडोकर, पवन महाजन, मुरलीधर मोरे
टॅग लाईन अ‍ॅन्ड लोगो डिझाईन स्पर्धेत प्रथम – प्रेरणा भूपेंद्र नेगी, द्वितीय – दिव्येश कृष्णकुमार कुलकर्णी व पियुष देवरे, तृतीय-गौरी राहुल कुलकर्णी
पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम – लवेल मित्तल, द्वितीय -वैष्णवी गोडेश्वर, तृतीय-मोनिषा बाळकृष्ण मांडोकर व रेणुका राजेश मुंगळे
बोर्ड रूम बॅटल स्पर्धेत प्रथम – “मुस्कान आहुजा, नेतल वर्मा, द्वितीय – तनुश्री नाहाटा, निशा पाटील व तृतीय -“प्रेरणा नेगी
बॉली जिज्ञासा स्पर्धेत प्रथम – कमलेश चौधरी लव्हली मित्तल, साक्षी जैस्वनी, द्वितीय – रोनित बाविस्कर, कुणाल शर्मारितेश पाटील, चेतन राठोड व तृतीय – हर्षिता कुकरेजा, श्रुती सोनार, वैष्णवी पाटील, प्राची भवर

Tags: business managmentG H Raisoni

Related Posts

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group