चाळीसगाव : कल्पेश महाले
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे उपोषण सुरु केले होते. त्यानंतर गुरुवारी हे उपोषण सरकारला दोन महिन्याच्या मुदतीवर स्थगित करण्यात आले असून सध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तर चाळीसगाव येथील समाजबांधवांनी चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे कि मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी या आशयाचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या जिवाची बाजी पणाला लावुन समाजासाठी लढत आहेत. तरी यापुर्वीची अनुभव पाहता जे नेते मराठा आरक्षणापान लढले त्यांच्या जीवाचे काही तरी बरेवाईट झालेले आहे. ती जरांगे पाटील यांच्याशी देखील काही दगाफटका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. तरी त्यांना महाराष्ट्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरविधात यावी. आणि त्यांचे रक्षण करून मराठा समाजाने संघर्ष योद्धा सुरक्षीत राहले पहिजे यासाठी शासनाने जबाबदारी पार पाडावी हि चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
निवेदनावर गणेश पवार, प्रशांत गायकवाड, भरत नवले, खुशाल पाटील, छोटू अहिरे, संजीव पाटील, राजेंद्र पाटील, बंडू पवार, दीपक चव्हाण, मिलिंद पवार, नितीन पाटील, सुमित जगताप यांच्यासह आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.