जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२५
देशभर सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरु असून व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देखील देऊ शकता. तुमच्या आवडत्या व्यक्तीला स्मार्टफोन भेट देणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.
वनप्लसने खास व्हॅलेंटाईन डे सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये तुम्हाला कंपनीच्या बेस्टसेलर स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. वनप्लसचा सेल 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये तुम्हाला 7 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
OnePlus 12
OnePlus 12 स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर 61,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. सेलमध्ये या फोनला आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदीवर 4 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि 3 हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट, अशाप्रकारे एकूण 7 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. बँक ऑफर ही ठराविक बँकांच्या कार्डवरच उपलब्ध आहे.
OnePlus 13
वनप्लस 13 खरेदीवर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटचा फायदा मिळेल. तर वनप्लस 13आर च्या खरेदीवर रेड रश डेज सेल दरम्यान 3,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही ऑफर ठराविक बँक कार्ड्सवरच उपलब्ध आहे. कंपनीने या वनप्लस 13 स्मार्टफोनला काही दिवसांपूर्वीच 69,999 रुपयांमध्ये लाँच केले आहे.
OnePlus Nord CE4
OnePlus Nord CE4 हा कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. या फोनला कंपनीने 26,999 रुपयात लाँच केले होते. मात्र, कंपनीच्या वेबसाइटवरून 23,999 रुपयात खरेदी करता येईल. यावर 3 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. यामध्ये 50 मेगापिक्सलचा सोनीचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
Oneplus Nord 4
Oneplus Nord 4 ची मूळ किंमत 32,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही फोनला ऑफरसह 28,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोनवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरचाही फायदा मिळेल. या सर्व फोनवरील ऑफर्सचा फायदा oneplus.in आणि ऑफलाइन पार्टनर स्टोर्सवर मिळेल. तुम्ही जर व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर या स्मार्टफोन्सचा नक्कीच विचार करू शकता.