जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
नेहरू युवा केंद्र व नीर फाऊंडेशन यांच्या संयुक्तीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा संवाद हा अनोखा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पार पडला.विविध शेत्रातील मान्यवरांचे चर्चा सत्र व संवाद यावेळी आयोजित केला गेला होता.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी ग्रामविकासातील युवकांचे योगदान या विषयवार व्यक्त होत आधुनिक तंत्रज्ञान ग्रामीणभागात रुजवणे अत्यंत गरजेचं आहे व युवक-युवतीचं प्रभावीपणे हे अंमलात आणू शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी राजकारणातील वस्तुस्थिती आणि युवकांचा राजकारणात लोभ नव्हे तर एक छंद म्हणून पुढाकार हवा असे प्रतिपादन केले.तसेच एम.जे.कॉलेजचे प्राध्यापक कॅप्टन योगेश बोरसे व गौग्रंथ कंपनीचे संचालक निखिल पाटील यांनी युवकांचे आरोग्य आणि युवकांसाठी उद्योग जगात असलेली संधी या विषयांवर स्वतःचे अनुभव व्यक्त करत युवकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री नरेंद्र यांनी केले व युवा संवाद या उपक्रमाचा मूळ हेतू नीर फाऊंडेशनचे संस्थापक सागर महाजन यांनी सांगितला.याप्रसंगी युवकांसाठी कार्य करत असलेले खान्देश अकॅडमीचे संभाजी पाटील आणि राहुल राठोड यांचा ग्रामगौरव प्रकाशनाच्या युवती संपादिका धनश्री ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून तरुणाना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तेजस पाटील,भावेश रोहिमारे,इरफान पिंजारी,योगेश चौधरी,आशिष सोनार,प्रदुम्न बोरसे रितेश भारंबे,रवी कुमार,आकाश गुजर,चेतन पाटील, हर्षा सरोदे, किरण तायडे,दर्शना गोसावी व नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी अजिंक्य गवळी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगी संथेचे अध्यक्ष गिरीश पाटील यांनी केल व सायली महाजन यांनी सर्व वक्त्यांचे-श्रोत्यांचे आभार मानत व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमची सांगता केली.