जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२३
राज्यातील एकनाथ शिंदे व फडणवीस, पवार यांच्या सरकारने पोलीस अधिकारी व कर्मचारीच्या परिवारासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर पोलीसांचा मृत्यू झालेल्या असताना विधवा पत्नीनं जर नंतर पुनर्विवाह केला तर तिला शासनाकडून मिळणार वेतन रोखलं जात होतं. पण अशा विधवांना दिलासा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागानं घेतला आहे.
शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणं, आपत्कालिन परिस्थितीत मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी पुन्हा वेतन सुरु करण्यात येणार आहे. अनेक शहीद पोलिसांच्या पत्नीनं याबाबत तक्रारी केल्या होत्या की, पुनर्विवाह केल्यानंतर त्यांचं वेतन शासनाकडून बंद करण्यात आलं होतं. शासनाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.