जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प. न. लुंकड कन्याशाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर यांच्या – संकल्पनेतून मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांचे व्याकरणाचे एकत्रित – तुलनात्मक पुस्तक तयार करण्यात आले आहे.
व्याकरण हा भाषेचा आत्मा – आहे. व्याकरणाला भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हटले जाते. याच व्याकरणाचा अभ्यास सहज, सोपा व सुलभ व्हावा या उद्देशाने मराठी, हिंदी व इंग्रजी व्याकरणाचे एकत्रित पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणार आहे. व्याकरणात बरेच घटक एकसारखे आहेत हे सर्व घटक भाषेनुसार एकाच पानावर घेऊन तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न धनगर यांनी केला आहे.
व्याकरण पुस्तक निर्मितीत शाळेतील सातवी व आठवीच्या ११ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.व्याकरण पुस्तिकेतील प्रस्ताविकेचे लेखन व प्रकाशन प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे यांनी केले. प्रकाशन प्रसंगी पद्मजा अत्रे, मुख्याध्यापिका स्वाती नेवे व इतर पदाधिकारी, शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.