जळगाव मिरर | १२ जुलै २०२६
रेशन कार्ड बनवून देतो, असे सांगत ३० वर्षीय महिलेशी जवळीक साधून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह तिचा विनयभंग केल्याची घटना दि. १० जुलै रोजी तहसील कार्यालयाजवळील एका चहाच्या टपरीजवळ घडली. याप्रकरणी सुनील पाटील याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील ३० वर्षीय महिलेला सुनील पाटील याने रेशन कार्ड बनवून देण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयाजवळ बोलावले. नंतर त्याने महिलेशी जवळीक साधून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुनील पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करीत आहेत.




















