
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले झेप प्रतिष्ठान यांच्यामार्फेत नवरात्रोत्सवनिमीत्त अयोध्या नगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील महिलांकरिता हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या महिलांचे हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी होते त्यांना गोळयांचे वाटप व मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिवीरास परिसरातील महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
या शिबीरासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र येथिल अर्जुन राठोड, उज्वला पाटील, योगेश पाठक यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन झेप प्रतिष्ठानचे सदस्य सौ.हर्षदा अविनाश पाटील, सौ. मनिषा पाटील, सौ. उपाबाई पाटील, मंगलाबाई पाटील, भावना भोळे, ललिता सपकाळे आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.





















