
जळगाव मिरर | १३ जून २०२४
देशातील सर्वात महत्वाची निवडणूक समजली जाणारी लोकसभा निवडणुकीचे निकाल येवून देशात सत्ता देखील स्थापन झाली आहे. नेहमीच राजकीय नेत्यांची संपत्ती चर्चेचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सर्वात दहा श्रीमंत खासदारांची यादी आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील खासदार आहे. सर्वाधिक संपत्ती भारतीय जनता पक्षाचे आंध्र प्रदेशातील खासदार डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 5 हजार 700 कोटींची संपत्ती आहे.
देशातल्या सर्वात 10 श्रीमंत खासदारांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचाही श्रीमंत खासदाराच्या यादीत समावेश आहे. त्यांच्याकडे भाजप 278 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी, आंध्र प्रदेश गुंटूर पक्ष TDP संपत्ती 5 हजार 700 कोटी
कोंडा विश्वेश्वर रेड्डी – तेलंगणा, चेलेव्वा , भाजप , संपत्ती 4568 कोटी
नवीन जिंदल – हरियाणा कुरुक्षेत्र भाजप १२४१ कोटी
प्रभाकर रे – आंध्रप्रदेश नेल्लोर, TDP , 716 कोटी
सीएम रमेश – आंध्र प्रदेश अनकापल्ली, TDP 497 कोटी
ज्योतीरादित्य सिंधिया – मध्य प्रदेश गुना , भाजप 424 कोटी
श्रीमंत शाहू छत्रपती – महाराष्ट्र कोल्हापूर , काँग्रेस , 342 कोटी
श्रीभरत मुथूकुमिली , आंध्र ,विशाखापटनम , TDP 298 कोटी
हेमा मालिनी – उत्तर प्रदेश मथुरा , भाजप 278 कोटी
डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन कर्नाटक दावनगिरी, काँग्रेस, 231 कोटीड्डी






















