जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बुधवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. कळवण रोडवरील संस्कृती लॉनजवळ मोटरसायकल व अल्टो कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून, दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री सुमारे ११:३० च्या सुमारास झाला.
सविस्तर वृत्त असे कि, अपघातातील मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त अल्टो (क्रमांक MH 04 DY 6642) ही प्रवाशांनी भरलेली होती. दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे:
- मंगेश यशवंत कुरघडे (वय २५),
- अजय जगन्नाथ गोंद (वय १८) — दोघेही राहणार नडगेगोट, तालुका जव्हार, सध्या सातपूर.
मृतांची नावे व ठिकाणे:
- देविदास पंडित गांगुर्डे (वय २८) – सारसाळे, ता. दिंडोरी
- मनीषा देविदास गांगुर्डे (वय २३) – सारसाळे, ता. दिंडोरी
- उत्तम एकनाथ जाधव (वय ४२) – कोशिंबे, ता. दिंडोरी
- अल्का उत्तम जाधव (वय ३८) – कोशिंबे, ता. दिंडोरी
- दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५) – देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी
- अनुसया दत्तात्रेय वाघमारे (वय ४०) – देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी
- भावेश देविदास गांगुर्डे (वय २ वर्षे) – सारसाळे, ता. दिंडोरी
मृतांचे शवविच्छेदन दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
