• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२६ 

धरणगाव तालुक्यातील सावदा-रिंगणगाव रस्त्यावर पाळधीजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला आहे. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते आपल्या दुचाकीने परतत असताना त्यांच्या दुचाकीवर वडील बाबूलाल राक्षे मागे बसले होते. दरम्यान, पाळधीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आणि चारही जण गंभीर जखमी झाले.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. तर बाबूलाल राक्षे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात झिरो क्रमांकाने नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी प्रकरण पाळधी आऊटपोस्टकडे वर्ग करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किरण राक्षे हे वेल्डिंग व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. तर चेतन पाटील हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे. अपघातातील मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

या भीषण अपघातामुळे पाळधीसह परिसरात शोककळा पसरली असून भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group