जळगाव मिरर | ८ मार्च २०२४
राज्यातील अनेक महामागार्वर गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य २ जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील तालसावाडा गावानजीक हा अपघात झाला असून घटनेची माहिती मिळताच तेथे तात्काळ रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मार्त पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अपघातग्रस्त वाहनांना देखील बाजूल केले आहे, त्यामुळे आता वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे सध्या काम सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. तालसावाडा जवळ सुद्धा एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे ही दोन्ही जात असताना समोरासमोर येऊन एकमेकांना धडकली आहेत. या अपघातामुळे मार्गावरील बऱ्याचवेळ वाहतूक खोळंबली होती.