• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

माणुसकी जिवंत : जळगावात बेवारस स्त्री-पुरुषाला वेळेवर उपचार मिळून वाचले प्राण !

"शावैम" च्या अधिष्ठातांसह कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे समाजातून कौतुक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माणुसकी जिवंत : जळगावात बेवारस स्त्री-पुरुषाला वेळेवर उपचार मिळून वाचले प्राण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर /२३ ऑक्टोबर २०२५

शहरातील नवीन बी. जे. मार्केट येथे बुधवारी दि. २२ रोजी एक महिला व एक पुरुष हे बेशुद्ध अवस्थेत बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती अधिष्ठातांना मिळाल्यावरून त्यांच्या सूचनेवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी तत्काळ धावून आले. त्यांनी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करून त्यांचे प्राण वाचविले. यातून, माणुसकी अजून जिवंत आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून नवीन बी. जे. मार्केट परिसरात एक महिला व एक पुरुष आजारी असून ते बेशुद्धावस्थेत असल्याचे कळविले. ऐन दिवाळी सणात लोकं आपापल्या घरी कुटुंबियांसह व्यस्त असताना, मार्केटमध्येही कोणी नसताना बेवारस स्थितीत असलेल्या या दोन्ही नागरिकांना अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी मदतीचा हात दिला. तात्काळ स्मार्ट सर्व्हिसेसचे कक्षसेवक सुपरवायझर राहुल सोनवणे यांना संपर्क साधून दोघांनाही स्ट्रेचरवर ठेऊन रुग्णालयात आणण्यास सांगितले.

राहुल सोनवणे यांनी कर्मचारी योगेश कासार, निलेश पाटील, भूषण सोनवणे, नकुल तायडे, मुकेश शिंदे, करण तायडे यांना सोबत घेऊन दोघंही स्त्री-पुरुषांना स्ट्रेचरच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून बेवारस रुग्णांच्या कक्षात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या मोफत भोजनाची व्यवस्था कर्मचाऱ्यांनी केली. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह जी.पी.एस. मित्र परिवार, पाळधी, जी. एम. फाउंडेशन, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष, विचार वारसा फाउंडेशन आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group