जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
जळगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेने पाळीव कुत्र्याला खायला दिले नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील पेठ भागातील रहिवासी असलेल्या आचल ज्ञानेश्वर नाथ (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा पती ज्ञानेश्वर दिलीप नाथ (वय २३) याने पाळीव कुत्र्याला खायला दिले नाही या कारणावरून पत्नीसोबत वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत असताना फिर्यादीच्या आई-वडिलांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्ञानेश्वर याने फिर्यादी व त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या हातावर पाय ठेवून जेवणाच्या फायबरच्या प्लेट फोडून दुखापत केली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.