• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

“मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
“मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जुलै २०२५

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना मात्र अद्यापही ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चाबाबत संभ्रम आहे. याच दरम्यान, राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात मुंबईत झालेला मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता, असे विधान केलं. यासंबंधी काही माध्यमांनी वृत्त देखील दिले. यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, असा आरोप केला आहे.

राज ठाकरेंची पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र,

१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.

त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका.

तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!

नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत.

माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असे राज ठाकरे म्हणाले.

या पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना असे प्रकार न करण्याची विनंती केली आहे. कोणतंही राजकीय विधान करायचं असल्यास आपण अधिकृत पत्रकार परिषद घेऊ, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group