जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना रेल्वे स्टेशन येथे राजनांदगाव ते कळमना दरम्यान तिसरी रेल्वे मार्गात कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहे. यासाठी भुसावळ विभागातून धावणाऱ्या जवळपास ३० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, रद्द करण्यात आलेल्या मेल एक्स्प्रेस गाड्या व त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे : क्र. १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस- १० व ११ ऑगस्ट, क्र. १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस १३ व १४ ऑगस्ट. क्र. १२८६० हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ५, ७, ११ व १२ रोजी, क्र. १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेसः ७, ९, १३, १४ ऑगस्ट. क्र.१८०३० शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ११ ते १७ ऑगस्ट तर क्र. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस १३ ते १९ पर्यंत. क्र. २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस – ५ व ९ तर क्र. २२८४५ पुणे
हटिया एक्स्प्रेस ७ व ११ रोजी. क्र. १२८८० भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस ८ व १५ तर क्र. १२८७९ लो. टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्स्प्रेस – १० व १७ ऑगस्ट.
क्र. १२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १६ आणि क्र. १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्स्प्रेस १८ ऑगस्ट
क्र. १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस- १५ रोजी तर क्र. १२२२१ पुणे -हावडा दुरांतो एक्स्प्रेस – १७ रोजी.
क्र. २०८५७ पुरी- साई नगर शिर्डी एक्स्प्रेस – ९ व १६ ऑगस्ट तर
क्र. २०८५८ साई नगर शिर्डी – पुरी एक्स्प्रेस ११ व १८ रोजी.
क्र. १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १६ रोजी तर क्र. १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १९ रोजी.
क्र. २०८२२ संत्रागाची पुणे एक्स्प्रेस-१७ रोजी, क्र. २०८२१ पुणे – संत्रागाची एक्स्प्रेस १९ रोजी. क्र. २२८९४ हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ८ व १५ रोजी तर क्र. २२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्स्प्रेस १० व १७ रोजी. क्र. २२९०५ ओखा शालिमार एक्स्प्रेस- १८ रोजी तर क्र. २२९०६ शालिमार ओखा एक्स्प्रेस २० रोजी. क्र. २२९७३ गांधीधामपुरी एक्स्प्रेस १४ रोजी आणि क्र. २२९७४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १७ रोजी.
पुरी-सुरत एक्स्प्रेसही रद्द
क्र. २२८२७ पुरी-सुरत एक्स्प्रेस- ११ रोजी, क्र. २२८२८ सुरत-पुरी एक्स्प्रेस १३ रोजी. क्र. २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस ५ व ८ रोजी. क्र. २०८२४ अजमेर- पुरी
एक्स्प्रेस – ६, ८ आणि १३ रोजी रद्द