अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंगाच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच अमळनेर शहरात देखील एका ३७ वर्षीय नोकरदार महिलेचा भररस्त्यावर विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरात ३७ वर्षीय नोकरदार महिला वास्तव्यास असून एका कार्यालयात हि महिला नोकरीस आहे. दि.३ नोव्हेबर, दि.११ नोव्हेबर व दि.२६ डिसेंबर २०२३ या दिवशी एका संशयित आरोपीने महिलेच्या ओळखीचा फायदा घेवून तिचा वेळोवेळी पाठलाग करीत तिच्या घरी व कार्यालयात जावून शिवीगाळ करीत तु मला आवडते, आपण दोघी लग्न करू असे म्हणत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तर महिलेला दुचाकीवर बसवून घेवून गेला व तुझ्या वडिलांना सांगेल कि तुझ्या मुलीचे लफडे आहे. असा दम देत विनयभंग केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अशोक साळुंखे करीत आहेत.