जळगाव मिरर / २० जानेवारी २०२३
शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था अमृत महोत्सवाची सुरुवात आज दिनांक २० जानेवारी 2023 रोजी शिंपी समाजाच्या मनोरमाबाई जगताप सांस्कृतिक कला सभागृह इथून दुपारी साडेतीन वाजता संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरा येथे संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारर्पण अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे स्वागत अध्यक्ष विवेक जगताप उपाध्यक्ष सतीश पवार अरुण मेटकर कार्याध्यक्ष शरदराव बिरारी व सर्व मान्यवरांच्या भव्य मोटार सायकल रॅलीचे सुरुवात करण्यात आली सदर रॅली रथ चौक भीलपुरा , टावर नेहरू चौक, छत्रपती शिवाजी पुतळा स्टेट बँक मार्गे बालगंधर्व समारोप झाला या ठिकाणी मंडप पूजन माजी अध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी केले तसेच अन्नपूर्णा भोजन गृहाचेपूजन प्रमुख रत्नाकर बाविस्कर दिलीप भामरे शिवदास सावळे यांच्या हस्ते करण्यात आले सदर या प्रसंगी भव्य मोटरसायकल रॅलीचे आकर्षण महिला भगिनींनी फेटे बांधून एकसारखी खनाची साडी परिधान करून युवक युवकांचा सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होता.
एक शिंपी लाख शिंपी, संत नामदेव महाराजांचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम चा जयघोष देऊन या भव्य रॅलीने जनतेचे आकर्षण करून घेतलेले होते सदरील रॅलीला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दि 21 जानेवारी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात बालगंधर्व येथील स्वर्गीय रामकिसन तोताराम शेठ नगर येथे कार्यक्रमाने सकाळी 9 वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत होणार आहे तरी उद्याच्या 21 व 22 च्या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था व स्वागत समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे