
जळगाव मिरर | ७ मे २०२३

जळगाव शहरातील एका परिसरात घरासमोर दुचाकी लावून दारूच्या नशेत काही लोक एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे अशा लोकांना इथे थांबू नका देत जाऊ, असे बोलल्याचा राग येऊन शेजारच्यांनी ममता नागेश मेढे (वय २४) या महिलेला लाथा-बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरमध्ये घडली.
मेढे या हरिविठ्ठलनगरमध्ये वास्तव्यास असून, शनिवारी सकाळी काही लोक त्यांच्या शेजारच्यांकडे आले होते. त्यांनी मेढे यांच्या घरासमोर दुचाकी उभ्या केल्या होत्या. दरम्यान, ते दारूच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना सांगितले की, अशा लोकांना थांबू देत नका जाऊ. मात्र, याचा राग येऊन शेजारच्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.




















