जळगाव मिरर / १६ मार्च २०२३ ।
जळगाव शहरातील एका परिसरात असलेले किराणा दुकानावर असलेल्या एका कामगाराने आपल्या दुकानमालकाला लाखो रुपयाचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानमालकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात नंदकिशोर भागवत शिंदे(वय ४३) यांच्या मालकीचे श्री समर्थ कृपा किराणा दुकान आहे. या दुकानात ५ फेब्रुवारी २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान एक तरूण या ठिकाणी कामाला असतांना त्याने लबाडीच्या इराद्याने येथून तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयाचा किमती किराणा सामान चोरून नेला आहे. या प्रकरणी दुकान मालक नंदकिशोर भागवत शिंदे (वय ४३) यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विशाल शरद पाटील (वय २२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.सुधीर साळवे हे करीत आहेत.