जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३ ।
आजवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या आजाराचे शोध लावले असतील पण अवघ्या 11 व्या वर्षात ज्यांचे शिक्षण घेण्याचे वय असते त्या वयात देशातील एका मुलीने डोळय़ांचे आजार सांगणारे अॅप बनवून रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, सध्या दुबईत राहणारी व मूळची केरळची लीना रफीक या मुलीने वयाच्या 11 व्या वर्षी कमाल केली आहे. तिने डोळय़ांचे आजार सांगणारे अॅप बनवले आहे. ऑग्लर आयस्पॅन असे या अॅपचे नाव असून ते आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित आहे. यामध्ये विशिष्ट स्पॅनिंग प्रक्रियेचा समावेश आहे.
अनेकदा डोळय़ांचे आजार दुर्लक्षित केले जातात. डोळ्यांचे आजार प्राथमिक स्तरावर योग्य उपचाराने बरे होतात. योग्यवेळी निदान न झाल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो. डोळय़ांच्या आजाराचे निदान करण्यासाठी लीनाने ऑग्लर आयस्पॅन अॅप विकसित केले आहे. याच्या मदतीने डोळय़ांच्या स्थितीबाबत माहिती मिळवता येते. तसेच मेलामेना, मोतीबिंदू, आर्कस अशा काही डोळ्यांच्या आजारांचे निदान करता येते. प्ले स्टोअरवर हे अॅप आल्यावर तिने या संशोधनाचा प्रवास लिंक्डइनवर उलगडला आहे. लीनाच्या अॅपची अचूकता 70 टक्के असल्याचे समजते. ऑग्लर आयस्पॅनव्यतिरिक्त लीनाने ‘लहनास’ ही वेबसाईटदेखील तयार केली आहे. लहान मुलांना शब्द, प्राणी -पक्षी तसेच रंग यांचा अभ्यास करताना या वेबसाईटची मदत होते.