जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।
पुष्पा या चित्रपटाच्या निमित्ताने अगदी घरोघरी पोहचलेला अल्लू अर्जुन आता पुन्हा एकदा पुष्पा २ च्या भूमिकेत देखील दिसणार आहे. या चित्रपट फक्त चित्रपट नव्हेतर चित्रपटाचे गाणेही हिट ठरले. अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले. जेंव्हा बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. अक्षय कुमार ते आमिर खान अशा मोठ्या स्टारचे बिग बजेटचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले, त्यावेळी प्रेक्षकांनी अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद दिला.
चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे पुष्पा 2 ची शूटिंग देखील सुरू करण्यात आलीये. पुष्पा द रूल असे या चित्रपटाचे नाव आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. काही दिवसांमध्ये पुष्पा द रूलचे शूटिंग हे हैद्राबादमध्ये केले जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी शूटिंग लवकर करून घेण्यावर भर दिला आहे. पुष्पा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यासोबतच एक साऊथचा मोठा चेहरा हा पुष्पा द रूलमध्ये धमाका करताना दिसणार आहे. रश्मिका मंदाना हिच्यासोबत पुष्पा द रूलमध्ये साई पल्लवी देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साई पल्लवी हिने साऊथच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका यापूर्वी केल्या आहेत.
साई पल्लवी हे साऊथचे अत्यंत मोठे नाव आहे. साई पल्लवी हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. साई पल्लवी ही पुष्पा द रूलमध्ये दिसणार असल्याचे कळत्याच चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळणार आहे. काही दिवसांमध्येच साई पल्लवी ही पुष्पा द रूलच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. रश्मिका मंदाना ही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
चित्रपटात साई पल्लवी हिचा झलक चाहत्यांना बघायला मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांनी अजून काही भाष्य केले नाहीये. रिपोर्टनुसार साई पल्लवी ही काही दिवसांमध्येच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. साई पल्लवी हिचा खास रोल चित्रपटात बघायला मिळणार आहे. आता पुष्पा द रूल काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.