
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व सर्वोदय क्रीडा मंडळ असोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोर गट स्पर्धा सार्वजनिक विद्यालय असोदा येथील क्रीडांगणावर पार पडल्या.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ जळगाव, व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स , डॉजबॉल संघटनेचे सचिव राजेश जाधव, सहसचिव सचिन महाजन, टेबल टेनिस NIS प्रशिक्षक विजय विसपुते, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सुनील राणे, उदय चौधरी, प्रशिक्षक व राज्य पंच आनंद महागडे,प्रा.हरीष शेळके, शकिलोद्दीन शेख, नितीन पाटील, विशाल सोनवणे, विनय चौधरी, दिपक बनसोडे , अनिल कोळी,डी.जी.महाजन उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन सुनिल राणे यांनी श्रीफळ वाढवून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन उदय चौधरी यांनी केले.राजेश जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मोबाईल , इंटरनेटच्या व शैक्षणिक स्पर्धेच्या युगामध्ये शालेय जिवनात मैदानावर उतरणे व त्यासाठी पालकांनी दिलेली संमती हे त्या मुलांचे भाग्यच आहे , असं सांगताना ते म्हणाले की आजकाल पालक सुध्दा आपल्या पाल्यांना मैदानावर पाठवायला तयार नसतात.मुलांच्या शारीरिक विकासासाठी मैदानावर उतरणे खूप आवश्यक आहे. विविध खेळांचे क्रीडा मंडळ चालवत असलेले प्रशिक्षक हे भारताची सुदृढ व निरोगी पिढी घडवत आहेत, असे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकालात प्रथम :– महर्षी फाऊंडेशन क्रीडा मंडळ, जळगाव, द्वितीय:-कैलास क्रीडा मंडळ जळगाव, तृतीय:-सर्वोदय क्रीडा मंडळ असोदा, उत्तेजनार्थ चतुर्थ:- महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ जळगाव, उत्कृष्ट चढाई:- निलेश वांद्रे, उत्कृष्ट पकड :- आदित्य तायडे, अष्टपैलू खेळाडू :- कृष्णा कोळी
सर्व खेळाडूंचे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सरकार्यवाह नितीन बरडे, संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ मिलिंद बागुल यांनी अभिनंदन केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वोदय क्रीडा मंडळाचे सदस्य व पंच रोहित सपकाळे, जितेश गायकवाड, अखिल कोळी, चेतन चौधरी, टिनूराज माळी यांनी सहकार्य केले.





















