अमळनेर : विक्की उत्तम जाधव
सरदार खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. त्यांनी सरदार खत कंपनीवर तहसिलदारांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
अमळनेर तालुक्यात सरदार खतामुळे अनेक शेतकऱ्यांची कापूस पिके कोमेजली आहेत. आणि लाल्या रोगामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. तरी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कंपनी विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, सचिन वाघ, संदीप घोरपडे, माजी जिप सदस्य के डी पाटील या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.