जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३
राज्यातील महामार्गावर दोन दिवसात दोन भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अपघातात २ जणाचा दुर्देवी मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हि घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर शनिवारी मध्यरात्री दुधाच्या टँकरची एका गाडीला जोरदार धडक अपघात झाला तर मुंबई ते कोल्हापूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला.
शनिवारी रात्री दुधाच्या टँकरची एका गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने ट्रकची केबीन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले.या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
त्यानंतर आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एका खाजगी बसला अपघात झाला आहे. मुंबई ते कोल्हापूर जाणारी ही खाजगी बस होती. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला आहे, तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे 3 वाजता ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी होते अशी माहिती आहे. काहींना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळेही काही काळ वाहतूक कोंडी मिर्माण झाली होती.