जळगाव मिरर | ३० नोव्हेंबर २०२५
भुसावळ मतदानाची तारिख जसजशी जवळ येतेयं तस तशी भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार होणार असून प्रभाग क्रमांक 21 ‘अ’ मधून नगरसेवक पदासाठी रोशनी कैलास शेलोडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला केलाय..त्यांची निशाणी घेऊन त्या मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहेत. प्रभाग क्रमांक 21 मधील बहुसंख्य महिला आणि पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. तसेच रोशनीताई ह्या एक संयमी, सुसंस्कृत , विश्वासदर्शक आणि उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. “ना जाती… ना पातीसाठ..! माझी उमेदवारी प्रभागाच्या विकासासाठी ” हे ध्येयवाक्य घेऊन दररोज आपल्या संपूर्ण प्रभागात फिरत आहेत आणि मतदारांचा कौल मागत आहेत.त्या मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून आपल्या विजयाचा ठाम विश्वास उमेदवार रोशनी कैलास शेलोडे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान ,याप्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला तसेच पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. त्यांच्या उमेदवारीने या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय.
तसेच रोशनी कैलास शेलोडे यांचे महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केले आहे. याप्रसंगी त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत मतदारांकडून त्यांना उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. म्हणूनच त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.





















